जनतेज न्युज

पवई च्या शंकराचार्य मार्गावर मोमोज विकणाऱ्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

प्रतिनिधी , पवई : पवई च्या शंकराचार्य मार्गावर मोमोज विकणाऱ्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.एकमेकांना चिडवण्यावरून ही हाणामारी झाली आहे.या प्रकरणी चार जणांना आता पर्यंत पवई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हे दोन्ही गट एकमेकांना ओळखतात.मोमोज विक्री चा धंदा करतात.मात्र काही वेळा पूर्वी त्यांच्यात एकमेकांना चिडवा चिडवि झाली आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.हा सगळा प्रकार एका व्यक्तींने त्याच्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.या प्रकरणी पवई पोलीस पुढील कारवाई करीत आहे.