प्रतिनिधी, भिवंडी : औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात औद्योगिक प्रगतीला गती मिळावी, या उद्देशाने केंद्रीय लघुउद्योक मंत्रालयाच्या सहकार्याने औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.11) या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई नागपूर mame चे संचालक पिम पारलेकर , आमदार निरंजन डावखरे , मनोहर डुंबरे , विलास साठे आणि दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनचे सेक्रेटरी विजय त्रिपाठी अध्यक्ष नरेश पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाचे आयोजन दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनचे सरचिटणीस विजय त्रिपाठी यांनी केले आहे.
11 ते 13 एप्रिल दरम्यान हे प्रदर्शन संपन्न होणार आहे. केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, केंद्राच्या विविध योजनांचा लाभ लघुउद्योजकांना मिळावा, या उद्देशाने दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सोमवारी या प्रदर्शनाचे इंडियन लॉजिस्टीक B 5 वेअर हाऊस भिवंडी येथे मुंबई नागपूर mame चे संचालक पिम पारलेकर आमदार निरंजन डावखरे आणि दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनचे सेक्रेटरी विजय रमेश त्रिपाठी अध्यक्ष नरेश पांचाळ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुंबई नागपूर mame चे संचालक पिम पारलेकर आ. निरंजन डावखरे यांनी, दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनने हे प्रदर्शन आयोजित करुन लघुउद्याोजकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा मार्ग दाखविला आहे. त्यामुळे आपण दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष नरेश पांचाळ आणि सरचिटणीस विजय त्रिपाठी यांचे विशेष आभार मानत आहोत. ठाणे जिल्ह्यात लघुउद्योजकांची मोठी संख्या आहे. उत्पादकांना आता बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशनने जो प्रयत्न सुरु केला आहे. ते कौतूकास्पद आहे. त्यामुळे ठाणेकर उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावूी, असे सांगितले.
यावेळी नरेश पांचाळ यांनी, दि मायक्रो स्केल इंडस्ट्रीज वेल्फेअर असोशिएशन आणि लघुउद्योग मंत्रालय एकत्रितपणे नवीन उद्योजक घडविण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवसायाचा विकास, उद्योजकांना सबसिडी देऊन प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे, असे सांगितले.
या संदर्भात विजय त्रिपाठी यांनी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने आणि भाजपचे शहराध्यक्ष आ. निरंजन डावखरे निलेश राणे सचिव महाराष्ट्र b.j.p यांच्या आदेशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. लघुउद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन केंद्रीय योजना जाणून घ्याव्यात, असे आवाहन केले.
