प्रतिनिधी , नवी मुंबई : अपघातात मृत्युमुखी पडणा-या संख्येमध्ये दरवर्षी १० % घट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी करण्यासाठीकेंद्र व राज्य शासनाकडुन विविध उपक्रम राबविण्यात येत असतात,
रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टिने, दरवर्षी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मुंबई
वाहतुक विभागातर्फे देखील रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करुन त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेवुन व वाहनचालकांनी तसेच नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोपरपणे पालन करावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असते. केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालय यांच्या निर्देशानुसार राज्यात दरवर्षी “ रस्ता सुरक्षा अभियान” कार्यक्रम राबविण्यात येत असतो. त्यानुसार यावर्षी देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या
कार्यक्षेत्रात, नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे १८ जानेवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत रस्ता
सुरक्षा अभियानाचे आयोजन केलेले आहे.
या अभियानामध्ये दिनांक १८ जानेवारी ते दिनांक १७ फेब्रुवारी या कालावधीत, . वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बाबत पत्रके वाटणे, बॅनर , संदेशाचे पोस्टर लावणे. वन डे विथ पोलीस कार्यक्रम
धार्मिक स्थळ या ठिकाणी पोस्टर लावुन जन जागृती करणे, रक्तदान शिबीरनाक, कान फुप्फुस तपासणी आरोग्य शिबीर राबविणे,मॉल, हॉस्पिटल, हॉटेल, बार समोर वाहतूक जनजागृती करणे,डोळयांचे तपासणी शिबीर ,रिक्षा टेम्पो, टॅक्सी, ट्रक चालक तसेच चालक प्रशिक्षण संस्थांना सहभागी करुन जनजागृती करणे,
रस्ता सुरक्षा थिम नुसार जनत छायात्रिकार यांच्यात छायाचित्रण स्पर्धा व फोटो प्रदर्शन कार्यक्रम राबविणे.
चौक सभा घेवुन जन जागृती,मोटार सायकल हेल्मेट रॅली, विशेष मोहिम राबवुन कारवाई करणे,व्हच्युअज मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन, शाळेत पपेट शो मार्फत ऑनलाईन क्लासच्या माध्यमातुन जन जागृती
सोशल मिडीयाचा वापर करुन नवी मुंबईततील सर्व नागरीकांना रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे
बाबत आवाहन करणेत येणार आहे. वाहन चालकांसाठी वाहतुक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे. महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर लावणे.रस्ते सुरक्षेबाबत निबंध/चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे,
इत्यादी कार्यक्रमाचे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले
आहे.
