प्रतिनिधि , बीड : देशासह संपूर्ण जग हादरवून सोडणार्या कोरोना माहामारीवरील लसीकरणाचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. संपूर्ण देशासह बीड जिल्ह्यात तसेच गेवराई तालुक्यात देखील या लसीकरणाला सुरुवात झाली असुन लसीचे डोस आरोग्य कर्मचारी ,आशा सेवीकांसह कोव्हीड योद्ध्यांना देण्यात येत आहेत. आज तालुक्यातील शंभर कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात येणार असल्याचे गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे..
