प्रतिनिधी, सांगली : नांदेड येथील बिलोली शहरात मूकबधिर तरूणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान तर्फे निदर्शने करण्यात आली
महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अनेक वेळा आवाज उठवला असून तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढत आहे व अश्या प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली
