प्रतिनिधि, मुंबई : अखेर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावीच लागली. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी तसेच आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा आणि आता मेट्रो रखडली यामुळे होणारा पाच हजार कोटींचा अधिक खर्च तसेच पाच वर्ष अधिक प्रतिक्षा याला जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टिका केली आहे.
