जनतेज न्युज

नागपूरात एरोमोडीलिंग शो चे उत्साहात आयोजन, एरोमोडीलिंग शो बघण्यासाठी हजारो मुलांची गर्दी

20 एरोमॉडेल, हॉर्स रायडिंग, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठरले मुख्य आकर्षण, मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे- क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे आवाहन..

प्रतिनिधी, नागपुर :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते । या एरोमोडीलिंग शो चे उदघाटन राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा हस्ते करण्यात आले, यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते । यावेळी हॉर्स रायडिंग ची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हॉर्स रायडींगचे प्रात्यक्षिक एनसीसी पथकाद्वारे सादर करण्यात आले । त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते । या एरोमॉडेलिंग शोमध्ये विविध प्रकारच्या 20 एरोमॉडेल्सचे प्रात्यक्षिक एनसीसी व हौशी एरोमॉडेलिंगचा मुलांनी यावेळी सादर केले । शहरातील मानकापूर परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित एरोमॉडेलिंग शो ला बघण्यासाठी हजारो विध्यार्थी,पालकांनी मोठी गर्दी केली होती । मुलांनी कॉम्प्युटर आणि वॉटसप  चा बाहेर पडून क्रीडा क्षेत्राकडे वळावे आणि जीवनात उंच भरारी घ्यावी असे आवाहन क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी केले