जनतेज न्युज

गॅस दरवाढीच्या भडक्याने सामान्य गृहिणी हवालदिल

प्रतिनिधी, औरंगाबाद : स्वयंपाकासाठी गॅस ऐवजी इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात. शासनाने पेट्रोल सह घरगुती गॅस च्या केलेल्या दरवाढीचा परिणाम सामान्य नागरिकावर दिसू लागला आहे. घरगुती गॅसच्या किमती हजारावर पोहोचल्या असल्याने आता नागरिक महिला स्वयंपाकासाठी गॅस ऐवजी इंधन म्हणून लाकडाचा वापर करत आहे.वाळूज महानगरात मागील काही दिवसापासून इंधन दरवाढीचा सामान्य नागरिकांवर झालेला परिणाम स्पष्ट दिसत आहे. शासनाकडून पेट्रोल ,डिझेल सह घरगुती आणि व्यावसायिक गॅसची दरवाढ केल्याने नागरिक हैराण आहे. शासनाकडून वेळोवेळी होत असलेल्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना इंधन वापरणे न परवडणारे झाले आहे. कमी पगारात घराचे बजेट बसवताना गृहिणींच्या नाकीनऊ येत आहे. गॅस दरवाढीमुळे घरातील बजेट कोलमडत असल्याने सामान्य महिलाना नाविलाजाने इंधन म्हणून लाकूड वापर करावा लागत आहे. त्यासाठी वाळूज महानगरात सामान्य महिला चूलीला लागणारी वाळलेली झाडांची लाकडे शोधून आणत आहेत. पूर्वीच्या काळी शहरासह खेड्यापाड्यात इंधना ऐवजी गृहिणी लाकडे वापरून चुलीवर स्वयंपाक करत असत. परंतु हळूहळू कालांतराने झालेल्या प्रगतीने इंधन वापरामुळे जवळजवळ चूल नाहीशी झाली होती. मात्र शासनाच्या निर्णयामुळे पुन्हा गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली असल्याने देश प्रगतशील होतो आहे का ?असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे