जनतेज न्युज

यंदा गुडीपढाव्याला ‘साखरेचे हार’ महागणार 100 ते 120 रुपये किलो ‘साखर हार’

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरात साखरहार निर्मितीची मोठी बाजारपेठ आहे. सोलापूरच्या साखरहारांना महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणातून मागणी असते. गुडीपाढव्याच्या सण ही अवघ्या आठवड्यावर येऊन थांबला आहे. मात्र, यंदा साखरहारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झालीय, त्यामुळे सामान्य नागरिकांना यंदा साखरहार महागल्याने जास्त पैसे मोजावे लागणारयेत. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून साखरहार व्यवसायाला फटका बसला होता, आणि यावर्षी बऱ्यापैकी कोरोनानियम शिथिल झाले आहेत. मात्र, इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचे थेट परिणाम साखरहारांच्या किंमतीवर होताना दिसून येतोय. मागच्या वर्षी 50 ते 60 रुपये प्रतिकिलो मिळणार साखर हार यावर्षी 100 ते 120 रुपये प्रतिकिलो झाला आहे.