ते वैफल्यग्रस्तं झालेले आहेत.” अशा शब्दात आज परिवहनमंत्री श्री. अनिल परब यांनी नारायण राणेंना सुनावले.
प्रतिनिधी , “सरकारने वर्षभर काम केलं आहे त्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झालेले आहेत व त्यामुळे ते विरोध करत राहणार हे देखील आम्हाला अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना सरकारने सुरुवातीलाच कर्ज माफी दिली. परंतु त्यानंतर आलेल्या कोरोनाने उत्पन्नाचे स्रोत कमी झाले. संपूर्ण जगाची दैना झाली. अश्या परिस्थितीत कधी कधी कर्ज काढावं लागते. राज्याची पत आहे म्हणूनच कर्ज मिळाले.” अशी प्रतिक्रिया आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी दिली.
मेट्रो कारशेडप्रकरणी प्रश्न विचारल्यावर,”कारशेडसाठीच्या जमीनीबाबत आम्ही अभ्यास करूनच कारशेड तिकडे नेण्याचे ठरविले आहे” असे उत्तर त्यांनी दिले.
मराठा आरक्षणावर बोलताना, “मराठा आरक्षण टिकावं यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, चर्चा सुरू आहे, हा विषय कोर्टात आहे. तसेच कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न बसता आरक्षण देऊ.” असे त्यांनी सांगितले.
“उर्मिला मातोंडकरांचे नाव शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेतही पाठवलेलं आहे, त्या उद्या देखील पक्ष प्रवेश करू शकतात. तसेच कॅबिनेटची मान्यता घेऊन नाव पाठवली आहेत, निर्णयाची वाट पाहत आहोत.” अशी माहिती श्री. परब यांनी दिली.
अधिवेशनाबाबत भाष्य करताना “4 डिसेंबरला कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल व परिस्थितीचा आढवा घेऊन निर्णय होईल” असे परब यांनी सांगितले.
