जनतेज न्युज

बिएचआर घोटाळ्यामध्ये माजी मंत्री सापडतील…..

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव ॲकर आज एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन बी एच आर गैरव्यवहार प्रकरणी अनेक मोठे फुलाचे केले यावेळी खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण ११०० कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत २०१८ मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्‍या चौकशीदरम्‍यान सापडलेल्‍या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्‍हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्‍हणून त्‍याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो.
गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता . त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणं उपयोग नाही . पूराव्या शिवाय मी बोलत नाही. असेही एकनाथ खडसे म्हणाले