अग्निशमन विभागाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.नाशिक दौऱ्यावर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थीतीची पाहणी करत माहिती घेतली..
प्रतिनिधी , नाशिक : आज नाशिक महानगरपालिकेत आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता.या वेळी आगीचे मोठे कल्लोळ आणि धूर बाहेर पडताना दिसून येत होते. महापालिकेतील शिवसेना गटनेता कार्यालय आणि विरोधी पक्षनेते कार्यालय येथे आग लागली.नाशिक दौऱ्यावर असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील याठिकाणी येऊन पाहणी करत घटनेची माहिती घेतली.महापालिकेचे फायर ऑडीट कधी झाले हे जर अधिकाऱ्यांना माहिती नसेल तर ही गंभीर बाब असून राज्यातील इतरही नगरपरिषद आणि महापालिकेच्या फायर ऑडीट संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे..
