प्रतिनिधी , पंढरपुर : मंगळवेढा नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन वर्षांचे अनुदान थकले आहे. यावर काही हालचाल होत नसल्याने आज चक्क लाभार्थी गाढवं घेऊन नगरपालिकेत धडकले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे प्रत्येक भारतीयाला हक्काचे घर. यासाठी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. यामध्ये लाभार्थ्याला 2 लाख 50 रुपये दिले जाते. यामध्ये राज्य सरकार १ लाख तर केंद्र सरकार १ लाख ५० हजार अनुदान देते. मंगळवेढा नगरपालिकेत २०१८ पासून ३५० लाभार्थ्याचे केंद्र सरकारचे १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान थकले आहे. हे अनुदान तात्काळ मिळावे यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय असे उत्तर प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.
