प्रतिनिधी , बीड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठ्या हिमतीने रेणु शर्मा यांनी आत्याचाराची तक्रार दाखल केली होती परंतु पोलीसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली नंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यात आले व रेणु शर्मा नावाची महिला कशा पद्धतीने चुकीची आहे ,चारित्र्यहिन आहे असा संदेश देण्यात सुरुवात केली आणी रेणु शर्मा त्यांचे वकील व रेणु शर्मांना सपोर्ट करणाऱ्यांवर दबाव आणला गेला आणि त्यामुळे रेणु शर्मा यांनी सदरील तक्रार मागे घेतली आहे अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
