जनतेज न्युज

महापालिकेतील गटनेता कक्षाला आग

प्रतिनिधी , नाशिक : नाशिक महापालिकेच्या गटनेता कार्यालयाला शुक्रवारी दुपारी आग लागली. शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या कक्षाला आग लागली. राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे. या आगीमुळे महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाला असून आतापर्यंत जीवितहानी झाली नसल्याचे कळते.