जनतेज न्युज

नियम न पाळल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन : वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचा इशारा

प्रतिनिधी , यवतमाळ : कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा फेब्रुवारी महिन्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली. यवतमाळ, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या पाच तालुक्यात सर्वाधिक संख्या आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, 26 फेब्रुवारीनंतर परिस्थिती आटोक्यात न आल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन करण्याचा इशारा पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिला. पोहरादेवी येथून दर्शन घेवून आल्यावर मंत्री राठोड यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेतला.