जनतेज न्युज

नोकरीचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; आरोपी अटकेत

प्रतिनिधी, नागपूर : सध्या देशात वाडती बेरोजगारी बघता मुलं आणि मुलींना कोणी ही नोकरीचा आमिष दाखवून फसवत आहे.असाच एक प्रकार नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पीडीत मुली वर लैंगिक अत्याचार झाल्याचा निष्पन्न झाला आहे.आरोपी निलेश हेडाऊ हा या मुलीला बस स्थाकन वर भेटला होता तिथे या मुलीला चांगली नोकरी लाऊन देतो अस विश्वास दिला होता.3 तारखेला फोन करून इंटरव्ह्यू साठी जायचा आहे असं आमिष दाखवून घेऊन गेला आणि मुली वर अत्याचार केला व न सांगण्याची धमकी दिली.मुलगी घरी पहुचल्या वर तिने आपल्या बहिणीला सांगितले व बहिणीच्या महण्यावरून तिनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीला अटक केली असून पोलीस तपास करत आहे.