जनतेज न्युज

पंकजा मुंडेना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याने मुंडे समर्थक नाराज.

प्रतिनिधी, बुलढाणा : भाजप च्या नेत्या पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले असून भाजपने आयात उमेदवारांना तिकिटे दिली. मात्र ज्या स्व गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भाजप वाढविला, त्या मुंडे साहेबांच्या कन्या , माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारले , असा आरोप मुंडे समर्थकांनी केला. पंकजा यांना भाजप ने विधानपरिषद तिकीट नाकारल्याने आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे टरबूज फोडून निषेध केला यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांत पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत..काल, परवा एका मुंडे समर्थकाने भर पत्रकार परिषदेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पंकजा मुंडे समर्थकांनी आघाडी उघडली आहे.पंकजा मुंडे या बहुजन नेत्या आहेत.त्यामुळेच भाजपा बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ देत नाही, असा आरोप समर्थकांनी केला आहे.तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती मधून भाजपाला हद्दपार करून भाजपच्या बहुजन विरोधी धोरणाचा बदला घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तर यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टरबुज फोडून भाजपचा जाहीर निषेध ही करण्यात आला आहे.