प्रतिनिधी, बुलढाणा : बुलढाणा शहरातील गजबजलेल्या चांडक ले आऊट परिसरात आज सकाळी 6 वाजतादरम्यान अस्वल आढळून आल्याने खळबळ उडाली.वन विभागाच्या पथकाने तीन तासाच्या प्रयत्नानंतर अस्वलाला पिंजराबंद केले आहे. पण, हे अस्वल इथवर कसे आले, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. चांडक ले आऊट परिसरात अस्वल शिरल्याचे सकाळी दिसून येताच वन विभागाला माहिती देण्यात आली. रॅपीड रिस्पॉन्स टीम आणि वन्यजीव संरक्षक दलासह पोलीस घटनस्थळी दाखल झाले. तोवर परिसरातील लोक घटनास्थळी अस्वल पाहण्यासाठी आले होते.गोंधळ वाढू लागत असतानाच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलावर निशाणा साधत बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात बंद करून जंगलाकडे घेऊन गेले आहे.
