जनतेज न्युज

पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात खा.सुनील मेंढे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

प्रतिनिधी , नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी करिता आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात झाली असून हळू हळू मतदानाची टक्केवारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात 18 हजार 434 मतदार आहेत.
भंडारा शहरातील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय येथे खा. सुनील मेंढे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क ब जावला. यावेळी त्यांनी राज्य सरकार वर टीका करीत मागील एक वर्षात राज्य देशोधडीला लागल्याची टीका केली..