जनतेज न्युज

राज्यात पहिल्यादांच चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशनची निर्मिती पुणे पोलिसांनी केली असुन त्याचे उध्दाटन अभय करंदीकर, डायरेक्टर, आय.आय.टी.कानपुर, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी , पुणे : शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत त्याची मुलेही येत असतात. तर काही ठिकाणी लहान मुलांचा वापर करुन चोरीही केली जाते अशी मुले जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये येतात तेव्हा पोलिसांबद्दल त्याच्या मनात भिती असते .तसेच कुटूंब कलाहामुळे मुलांच्या मनावरही त्याचे विपरीत परीणाम होत असतात. अशी मुले जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा त्याच्या मनावरील दडपण कमी करण्याकरता चाईल्ड फ्रेंडली पोलिस स्टेशनची निर्मिती होप फाँऱ द चिल्ड्रन फांऊडेशन आणि पुणे पोलिस यांच्या संयुक्त विदयमाने सुरु करण्यात आली.शहरातील लष्कर पोलिस स्टेशनच्या आवारात हे स्टेशन सुरु करण्यात आले.
या स्टेशनच्या भिंती विविध कलाकृती साकारुन रंगविण्यात आल्या असुन खेळणी, खुर्च्या ,टेबल ,पुस्तकेही ठेवण्या आली आहेत. या स्टेशन मध्ये महिला पोलिस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असुन तेच इथ येणा-या मुलांचे मनोधैर्य वाढविणार आहेत.