जनतेज न्युज

पाचोरा येथे कापूस पिक परिसंवाद व तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी, जळगाव : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग पाचोरा, निर्मल सिड्स प्रा. लि. पाचोरा व कृषी विज्ञान केंद्र, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजनेअंतर्गत कापूस पिक परिसंवाद तथा तालुकास्तरीय खरीप हंगामपुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्ग येथील सारोळा रोडवरील समर्थ लाॅन्स मध्ये आज दि. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, निर्मल सिड्स प्रा. लि. च्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, प्रगतशील शेतकरी विश्वासराव शेळके, रमेश बाफना, प्रकाश देशमुख सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. डी. बी. चौधरी, डॉ. हेमंत बाहेती, डॉ. महेश महाजन, वैभव सुर्यवंशी, प्रा. सुदामसिंग राजपुत, अनिल भोकरे, किशोर पाटोळे, पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिका संबंधित मोलाचे मार्गदर्शन केले.