प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार तालुका पोलीस हद्दीतील नागरीकांच्या पोलीस विभागा संदर्भातील तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आज पोलीस दलाच्या वतीन जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या या जनता दरबाराला नागरीकांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला. जवळपास तीनशेहुन अधिक नागरीक या जनता दरबार च्या ठिकाणी आपल्या समस्यांचे निऱ्हाकरण करण्यासाठी उपस्थित होते.
आजच्या जनता दरबारात पाच जोडप्यांमध्ये कौटुबीक कलाहाचा समेट घडवुन आणण्याचे काम करण्यात आले. तर 10 हुन अधिक नागरीकांना चोरीला गेलेल्या मोबाईल परत करत करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजीत करण्यात आलेल्या पोलीस जनता दरबार माध्यमातुन समस्यांचे निराकरण होत असल्यान नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या जनता दरबारचे उदघाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक पी आर पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पोलीस दलाच्या या उपक्रमाबाबत कौतुक केले आहे.तर जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले की आता तालुका स्तरावर जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे यापुढे शहरी भागात तसेच ईतर तालुक्यातील ठिकाणी देखील जनता दरबार आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येतील…
