प्रतिनिधी, बुलडाणा : साखर कारखाने चालवायची जवाबदारी ही स्थानिक प्रशासनाची असते राज्य सरकार ची नसते सरकार फक्त सुविधा उपलब्द्ध करून देते कारखाना चालला नाही तर त्याला स्थानिक प्रशासन जवाबदार असते असे उदगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सिंदखेडराजा येथे व्यक्त केले.. उजनी धरणाची योजना ही बावीस वर्ष जुनी आहे.. सोलापूर जिल्ह्याला त्यातूनच पाणी वाटप होत आहे.. प्रत्येक योजनेची घोषणा झाली तर त्या वेळेस ती पूर्ण होत नाही, आपण विकासाचा मुद्यावर बोलायच्या ऐवजी भोंगे आणि इतर बाबी वर बोलल्या जाते असे ही अजित पवार म्हणाले महाविकास आघाडी च्या निवडणुका ह्या स्थानिक पातळी वर ठरते असे ही ते म्हणाले.. नवाब मलिक यांच्या डी गॅंग आरोपावर ते म्हणाले की माहिती घेतो ..मंदिर दर्शन घेणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे ते म्हणाले.. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे सिंदखेड राजा दौऱ्यावर आले होते.. त्यांनी यावेळी जिजाऊ जन्मस्थळ ची पाहणी करून तेथील ऐतिहासिक स्थळाची पाहणी केली.. यावेळी त्यांनी सिंदखेड राजा विकास आराखडा व जिल्हा विकास आराखडा संदर्भात आढावा बैठक त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले आहे..
