प्रतिनिधी, कल्याण : कल्याण ग्रामीण मधील पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे.काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी भाजप-मनसे एकत्रित मोर्चा काढला.तरीपण महापालिका प्रशासनाने याकडे गामभिर्याने लक्ष दिले नाही.त्यातच काल पाणी नसल्याने कपडे धुण्यास खदानीवर गेलेल्या गायकवाड कुटुंबातील 5 जणांचा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले तर दुसरीकडे डोंबिवलीतील देसलेपाडा परिसरात राहणारे नागरिक ही पाण्यासाठी आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरले आहेत. देसलेपाडा परिसरात एकूण 12 सोसायटी असून या सोसायटीत महानगरपालिकेचे 24 तास पाणी असेल असे सांगून या इमारतीच्या 60 ते 65 रहिवाशांना विकासकांनी घरे विकली आहे मात्र पिण्याचे पाणी येत नसल्याने या नागरिकांनी विकासकाच्या कार्यालयावर पाण्याच्या बॉटल हातात घेत बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा काढला
यावेळी त्यांनी आपला राग व्यक्त करत आठ दिवसात पाणी मिळाले नाही तर आयुक्त कार्यालावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.दरम्यान पाणी टंचाईने पाच जणांचे बळी घेतले आता तरी प्रशासनाला जाग येईल का? हे पाहावे लागेल…
