जनतेज न्युज

सोलापूरकरात ‘पाणीबाणी’ शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा..

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर शहरात चार दिवसातून मिळणाऱ्या पाण्याचे नियोजन आता कोलमडलेय. शहरातील पाच्छा पेठ सह विविध भागात आठ दिवसानंतर टॅंकरद्वारे पाणी मिळतय. शहरात एकूण 5 टॅंकरद्वारे हा पाणीपुरवठा केला जात आहे. उजनी जलाशयात मुबलक पाणी साठा असुनही केवळ महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. महावितरण आणि महापालिका प्रशासनाच्या विसंवादामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आठ दिवसानंतर टॅंकरद्वारे पाणी भरण्याची वेळ आलीय. नागरिकांतून महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला जातोय.