जनतेज न्युज

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

प्रतिनिधी ,अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.

पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी आज तिवसा येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे यांच्याशी चर्चा करुन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

रुग्णालयात क्वारंटाईन कक्षासह इतर आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. वैद्यकीय पथके वेळोवेळी आवश्यक त्या तपासण्या करत आहे. आवश्यक प्रशिक्षण, डॉक्टर, पारिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्या साधन सामुग्री उपलब्ध करुन घ्यावी. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांपर्यंत दक्षतेबाबतची माहिती विविध माध्यमांतून पोहोचवावी. बाहेरुन आलेल्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळत नसली तरी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशा नागरिकांशी पथकांद्वारे वेळोवेळी संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवावे. कुठलीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधावा असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

नगराध्यक्ष वैभव वानखडे,उपसभापती शरद वानखडे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे,संध्या पखाले,हिमानी भोसले,शिवा तिखाडे,रवींद्र हांडे, संदीप आमले, लोकेश केणे, तहसीलदार वैभव फरतारे,मुख्याधिकारी पल्लवी सोटे,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.