जनतेज न्युज

पावसाच्या पाण्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला

प्रतिनिधी, नांदेड : गेली अनेक दिवसापासून हिमायतनगर तालुक्यामध्ये ढगफुटी ही मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे हिमायतनगर ते पळसपुर डोलारी सिरपल्ली विदर्भ ला जाणारा रस्ता वरील पूल हे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडत आहे तरी

सार्वजनिक बांधकाम विभाग कडे वारंवार विनंती करून देखील निवेदन देऊन प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही आता तरी प्रशासनाने या पूलाची उंची वाढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा जेणेकरून जनजीवन सुरळीत होईल अशी सर्वसामान्य नागरिकांची प्रशासनाकडे मागणी आहे आता पर्यंत चारवेळा रस्ता बंद झाला आहे