जनतेज न्युज

तर मुख्यमंत्र्यांचा पायागुण वाईट असेच म्हणावे लागेल – बाळासाहेब सानप

प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्रात ज्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका ओबीसी शिवाय होणार याबाबत सुप्रीम कोर्टाकडून पत्र जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवस आम्ही आनंद साजरा केला. ओबीसी आरक्षण म्हणून निवडणूका होणार, मात्र आज कोर्टाची ऑर्डर आली की ओबीसी आरक्षणाशिवाय निवसनुका होणार, वाईट वाटलं… राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते की , ओबीसींसाठी माझा पायगुण चांगला आहे. ओबीसी सोबत निवडणुका झाल्या मात्र आज जर अस पत्र निघत असेल तर मुख्यमंत्र्यांचा पायगुण वाईट आहे का अस म्हणावं लागेल, अशी टीका व्ही जे एनटी अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.

महाराष्ट्रल्या आणि केंद्रातल्या मंत्र्यांना सानप यांनी आव्हान दिले आहे की, व्ही जे एन टी जनमोर्चाच्या वतीने अस्तित्वाची लढाई सुरू करू, जेजे घडेल त्याला तुम्ही सर्व मंत्री जबाबदार आहात. जर ओबीसी शिवाय निवडणुका घेतल्या तर कायम स्वरूपी चक्का जाम आंदोलन करू, रस्त्यावरची लढाई लढू, ज्या ज्या घडामोडी घडतील त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती आहे की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नका, अन्यथा ओबीसीचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सानप म्हणाले आहेत.