प्रतिनिधी, बुलडाणा : रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान. मात्र, याच दानाकडे आता थोडे दुर्लक्ष केले जात आहे. कारण, सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीत सध्या अत्यल्प रक्तसाठा असून, दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे. तेव्हा रक्तदानासाठी दात्यांनी पुढे यावे असे आवाहन केले जात आहे.सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. अपघातातील रुग्णांसह काही महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असते ते रक्त. मात्र, मागील काही दिवसांपासून आणि कोरोनाच्या काळात बंद झालेले रक्तदान यामुळे येथील शासकीय रक्तपेढीत सध्या केवळ 29 पिशव्यांच्या रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे. संकलित केलेल्या रक्त गटाच्या पिशव्या त्याच दिवशी दिल्या जात असल्याने त्याचा साठा शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे.तसेच 2021 मध्ये ब्लड डोनेशन कॅम्प 51 झाले आहेत त्यामधून 2879 रक्त संकलित झाले तसेच3078 रक्तपिशव्या वाटप करण्यात आले आहे.. मात्र जीवन अमृत योजना बंद केल्यामुळे कर्मचारी कमी करण्यात आले त्यामुळे त्यांचा ताण यावर्षी झाला आहे जानेवारी 22 ते जून 22 पर्यंत 1910 रक्तपिशव्या संकलित करण्यात आले आहे तसेच रक्तपिशव्यांची वाटप 1978 करण्यात आले आहे.. कर्मचाऱ्यांचा ताण आणि रक्त संकलित कमी झाल्यामुळे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये 29 रक्त रक्त पिशव्या चा साठा उपलब्ध आहे..यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून, जिल्ह्यात रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तेव्हा रक्तदानासाठी दात्यांनी पुढे यावे असे आवाहन रक्त संकलन अधिकारी डॉ. शितल सोळंकी यांनी केले आहे.
