जनतेज न्युज

मलकापुरच्या स्वयंघोषीत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजावर शिष्याने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी, उसमानाबाद : राज्यभर प्रसिद्ध असणारे उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आसुन महाराज सध्या फरार आहे .पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला असून त्याची क्लिप माझ्याकडे असल्याचे धमकावत विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजवर या अगोदर ही अनेक फसवणूकीच्या व भोंदूगिरीच्या तक्रारी आहेत. राजकिय वरदहस्त असल्याने महाराज अनेकदा चर्चेत आले आहेत.