शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अनोखे आंदोलन…
तहसील कार्यालयाच्या आवारात लावलं सरकारचं लग्न,तर शहरातून काढली वरात ..
प्रतिनिधी: बुलडाणा , राज्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनोखे आज सिंदखेड राजा येथे अनोखं आंदोलन करण्यात आलेय.पिकविम्याची वरात केंद्र आणि राज्य सरकारच्या दारात, हे आंदोलन करत स्वाभिमानि शेतकरी संघटनेने चक्क वधु – वराची शहरातून वरात काढत तहसील कार्यलयात जाऊन सरकारचे लग्न लावलंय..
राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकटं अजिबात थांबतांना दिसत नाही.मात्र निसर्ग पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांची परीक्षा घेतांना दिसत आहे.बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावं लागत आहे. दीड दोन वर्षांपासून कोरोनामुळे तर सर्वकाही ठप्प असल्याने याचा आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय.गेल्यावर्षीचा पीकविमा सरकारने अजूनही दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सिंदखेड राजा येथे अनोखे आंदोलन करत तहसील कार्यालयाच्या आवारात सरकारचं लग्न लावलंय.केंद्र आणि राज्य सरकारने आता तरी मतभेद बाजूला सारत केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलीय.या अनोख्या आंदोलनाने मात्र नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.तसेच या आंदोलनात शेकडो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते…
