जनतेज न्युज

पुणे-नाशिक महामार्गावर हरभरा घेऊन जानाय्रा ट्रकचा डोळासने येथे भीषन अपघात

प्रतिनिधी , अहमदनगर: पुणे-नाशिक महामार्गाच्या डोळासने येथे ट्रकचा भीषन अपघात झाला आहे.पुणे-नाशिक या महामार्गावर गुजारात राज्यातुन हरभरा घेऊन येत असलेला ट्रक चालकाचे नियंत्रन सुटुन ट्रक संगमनेरच्या डोळासने येथील पुणे-नाशिक महामार्गा वरील पुलावरून कोसळत पलटी झाला आहे.
या अपघातात सुदैवाने ट्रकचा चालक व साथीदार र्देुघटनेतुन थोडक्यात बचावले आहे.घटनेची माहीती मिळातच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांची टिम घटनास्थळी पोहचली असुन अपघात ग्रस्त ट्रक बाजुला घेन्याचे काम सुरू आहे. ऐकुनच वाहनचालकांनी पुणे-नाशिक महामार्गावर वाहने चालवत असताना पुर्ण नियंत्रन वाहनांवर ठेवुन वेग मर्यादेचे पालन करा असे आव्हान महामार्ग पोलिसांकडुन करण्यात आले आहे.या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असुन कडधान्याचे देखील यात मोठे नुकसान झाले आहे.