प्रतिनिधी , पुणे : मुंडवा केशवनगर या भागांमध्ये बांधकाम विकास विभाग पुणे महानगरपालिका यांचेकडून अनधिकृत बांधकामाबाबत मोठ्या स्वरूपात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडील कर्मचारीवर्ग व पोलीस स्टाफ उपस्थित होता त्याच बरोबर येथील स्थानिक पोलिसांचा देखील संरक्षण घेण्यात आले या कारवाईमध्ये सात इमारती निष्कासित करण्यात आल्या व एकूण सुमारे पंचवीस हजार चौरस फूट एवढे बांधकाम पाडण्यात आले. हे सर्व बांधकाम पक्क्या स्वरूपाचे आरसीसी स्वरूपात होते. या कारवाईसाठी महापालिकेने अत्याधुनिक मशिनरी चा वापर केला यामध्ये jaw कटर मशीन व पोकलेन तसेच इतर संबंधित साहित्य सामग्री चा वापर करण्यात आला. या कारवाईसाठी महापालिकेकडून उप अभियंता कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. कारवाई करताना येथील नागरिकांनी कारवाईस प्रखर विरोध केला परंतु स्थानिक पोलिस व अतिक्रमण विभागाकडील पोलीस यांच्या सहकार्याने सदर विरोध डावलून महापालिकेकडून कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. अशा स्वरूपाच्या कारवाई मुळे या भागातील अनधिकृत बांधकामे थांबविण्यात महापालिकेला यश येणार आहे.
