जनतेज न्युज

अज्ञानात व्यक्तीने तीनशे केळीचे घड कापून नुकसान केले सुसरी शिवारात शेतकरी त्रस्त

प्रतिनिधी , भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुसरी शिवारक्रमांक २००-१ शिवारात चंद्रशेखर झोपे यांचे शेत आहे. या शेतात साडेचार एकर जागेत सात हजार केळीची झाडे आहे. या बागेत दि. १० मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत अज्ञात व्यक्तीने झाडावरील केळीचे घड कापून शेतात फेकून १ लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान केले आहे.. तसेच पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी देखील तोडली असल्याने शेतातील पाणीपुरवठा देखील करता आला नाही. तसेच या शिवारात सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीची पाण्याची विहिर आहे. या विहीरीवरील मोटारील विजपुरवठा करणाऱ्या केबलची देखील चोरी करण्यात आली आहे. या परिसरात शेतकऱ्यांना नेहमीच केबल, मोटारी, पाण्याचे स्प्रींकलर, मोटार सुरू करण्याचे स्टार्टर यासह इतर साहित्याची नेहमीच चोरी होत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहे. एका बाजुला निसर्गाचा मारा झाल्याने शेतमालाचा नुकसान झाले आहे तर दुसऱ्या बाजुला शेती साहित्या चोरी करणारी टोळी कार्यरत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच आर्थीक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीसात अज्ञान आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहे.