जनतेज न्युज

पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांच्या माध्यमातून शहरातील समर्थ पोलीस स्टेशन येथे आज सीसीटीव्ही आणि सुसज्ज नियंत्रण कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

प्रतिनिधी , पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांच्या माध्यमातून शहरातील समर्थ पोलीस स्टेशन येथे आज सीसीटीव्ही आणि सुसज्ज नियंत्रण कक्षाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हा लोकार्पण करण्यात आले.स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणारं समर्थ पोलीस स्टेशन हे शहरातील पहिलं पोलीस स्टेशन ठरलंय. यापुढच्या काळात महापालिकेच्या मदतीने शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये स्वंतत्र नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलीय.