प्रतिनिधी , बुलडाणा : पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांनाच नव्हे तर आस्मानी व सुल्तानी संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसत असल्याचे पहावयास मिळत आहे.या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून पिकवलेल्या मालाची वाहतूक करण्यास तीनपट भाडे मोजावे लागत आहे.यामुळेच पालेभाज्या मार्केटमध्ये नेवूनही नफा तर नाहीच मात्र तोटा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शिवाय वाहतूक करणारे ही पेट्रोल-डिजलच्या दर वाढीमुळे शासनावर नाराज आहे..
चिखली तालुक्यातील डोगरशेवली या छोट्याश्या गावात बबन रामरतन सावळे हे आपल्या दोन एकर शेतीमध्ये कित्येक वर्षांपासून पालेभाज्यांचा व्यवसायावरच परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे.शेतकरी बबन सावळे हे अनेक वर्षपासून पालेभाज्या विक्रीसाठी बाजारात नेत असतात त्यावेळचा वाहतूक खर्च आणि आता चा खर्च बरीच तफावत आहे.ते डोगरशेवली येथून कधी बुलडाणा तर कधी चिखली शहराच्या बाजारपेठेत आपल्या पालेभाज्याची ऑटोने वाहतूक करीत असतात.त्यांना वेगवेगळे वाहतूक भाडे भरावे लागत आहे. वेगवेगळ्या वेळी वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे,ज्या ठिकाणी या वाहतुकीसाठी काही वर्षां अगोदर वीस रुपये द्यावे लागत होते. त्याच ठिकाणी आता तिपटीने म्हणजेच साठ रुपये प्रमाणे अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
