जनतेज न्युज

महाराष्ट्रात परदेशातून आलेलेला एकही कोरोनाचा रुग्ण नाही-आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी , मुंबई : आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी ब्रिटनमध्ये आढळलेल्या नविन कोरोना विषाणू संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी महाराष्ट्रात परदेशातून आलेलेला एकही कोरोनाचा रुग्ण नाही,अशी माहिती दिली.मात्र,देशात दिल्लीत,हैदराबादमध्ये नवीन कोरोनाचा विषाणू असलेले रुग्ण आढळल्याचे सांगितले आहे.
याचधर्तीवर महाराष्ट्रातही काळजी घेतली जात आहे.रॅपिड टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत.बाहेरून येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग केली जात आहे.जर कोणी परदेशातून शेजारी राहायला आले असेल तर त्यांची माहिती आरोग्य प्रशासनाला द्यावी असे आवाहनही यावेळी राजेश टोपे यांनी केले आहे.