प्रतिनिधी , ठाणे : बारामती शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे आणि वाहतूक पोलिस शाखा यांच्या करता बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.. बारामतीत सर्वच प्रशासकीय इमारती सुसज्ज करण्यात आल्या आहेत.. याप्रमाणेच याही इमारतीसाठी ११ कोटी रुपये खर्चून अद्यावत इमारत बांधण्यात येणार आहे.. १ वर्षाच्या कालावधीत यांचे काम पूर्ण होणार असून लवकरच बारामती करांना दर्जेदार पोलिस कार्यालय मिळणार आहे..
