जनतेज न्युज

रिपाई जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी ला अटक ,पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ,महिलेकडून रुपये होते दागिने.

प्रतिनिधी , जळगाव :-भुसावळ पोलीस प्रशासनातर्फे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वचक राहावा म्हणून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले,यात अनेक सराईत गुन्हेगार तपासणी करण्यात आली तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने वरणगाव येथे लुटल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे भाऊ आनंत सूर्यवंशी यांच्यासह लोहमार्ग पोलिसांना हवे असलेल्या दोन आरोपींना ही अटक करण्यात आली,
शनिवारी रात्री पोलिसांच्या पाच तुकड्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी मोहीम राबवली अजामीनपात्र सहा वारंट ची अंमलबजावणी हद्दपार आरोपींची चौकशी करण्यात आली मात्र यातील एकही शहरात आढळला नाही 58 पोलिसांनी बजावणी केली तसेच रेकॉर्डवरील 85 गुन्हेगाराची तपासणी केली याशिवाय मास्क न लावणाऱ्या छत्तीस नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली त्याचे उल्लंघन करणाऱ्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व कागदपत्र ऑफिस स्वरा नाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले
पिस्तुलाचा धाक दाखवून वरणगाव येथील महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढल्याप्रकरणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे भाऊ आनंद सूर्यवंशी यांच्याविरुद्ध संजय त्रीलोकनाथ खन्ना राहणार साई नगर दर्यापूर शिवार वरणगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सूर्यवंशींना रात्री अटक करण्यात आली आहे