जनतेज न्युज

पोलीस जीप च्या धडकेत एक ठार तर एक जखमी.

प्रतिनिधी, बुलढाणा : आरोपींना घेऊन कोर्टासमोर हजर करण्यासाठी बुलडाण्याकडे येणाऱ्या पोलीस जीपने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कोलवड या गावाजवळ आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.. उबाळखेड येथील आकाश राजगुरू व दशरथ शालीकराम देवकर हे दोघे दुचाकीने कोलवड कडे जात असताना धाड पोलीस स्टेशनची जीप दोन आरोपींना बुलडाणा कोर्टासमोर हजर करण्यासाठी धाड येथून बुलढाणा कडे जात असतांना दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.. यात आकाश व दशरथ दोघे गंभीर जखमी झाले होते..त्यांना त्याच जीपमध्ये बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले आहे.. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात गावकरी नातेवाईक व मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली… पोलिस जीप चालक दीपक डिघोले हा दारू पिऊन जीप चालवत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात मोठी गर्दी जमल्याने पोलीस बल तैनात करण्यात आले आहे.