जनतेज न्युज

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतल्या धरणात उडया… आंदोलन दुर्लक्ष झाल्याने जलसमाधी चा प्रयत्न… निम्मा ज्ञानगंगा प्रकल्पग्रस्त आहेत शेतकरी..

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा येथील ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बृहत लघुपाटबंधारे योजने अंतर्गत धरणाचे काम पूर्ण केले असले तरी प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. त्यामुळे 26 जानेवारी पासून शेतकर्‍यांनी प्रकल्पस्थळी आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र या आंदोलनाला प्रशासनाकडून दुर्लक्षित केले गेल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलीत ज्ञानगंगा धरणामधेच उड्या घेऊन जलसमाधीचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्ह्यात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात दाखल होत असतानाच त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या त्या टोकाच्या पाऊलामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी शुक्रवारी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र शुक्रवारी पहाटेच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांना ताब्यात घेऊन खामगाव पोलीस स्टेशनला आणले यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत धरणांमध्ये उड्या घेतल्या…