प्रतिनिधी , पंढरपूर :100 व्या किसान रेलला हिरवा झेंडा दाखवणारे पंतप्रधान मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार किसान आर्मीचे व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. 28 डिसेंबर रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, कृषीमंत्री तोमर, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगोला ते पश्चिम बंगाल अशी शंभराव्या किसान रेलला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ केला होता. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार प्रफुल्ल कदम यांनी दाखल केली आहे.
