जनतेज न्युज

प्रशासन व जिनींग मालकाचा भोंगळ कारभार, कापूस खरेदी केंद्रा बाहेर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा.

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्हा हा पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो , गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढले आहे, जिल्ह्यात यंदा ५ लाख ३०हजार हेक्टर कापसाची लागवड करण्यात आली होती , त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झाली आहे, शेतात पिकलेला कापूस शेतकरी हा वाहना मध्ये भरून जिनींग ला विक्री साठी घेऊन जात आहे, परंतू पाच जिनींग साठी एकच अधीकारी असल्याने कापूस खरेदी ला विलंब होत आहे ,त्या मुळे जिनींग च्या बाहेर पाच किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या चे चित्र पाहायला मिळत आहे, शेतकरयांना या मुळे रस्त्यावर चार चार दिवस थंडीत उपाशी राहून काडवे लागत आहेत ,जिनींगवाले व व्यापारी यांचीही मिलीभगत असलेल्यांनी व्यापार्याचा कापूस लगेच खरेदी केला जात आहे ,एका किंव्टल मागे चार किलो कटी व एका किंव्टल मागे २०रू हमाली माफाडी शेतकऱ्यांवर लादली जात आहे,४५००रूपये किंव्टलला शेतकऱ्यांच्या हातात पडतायत ,जिनींग मालक , व्यापारी, व प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आम्ही वैतागलो आहे असे कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी सांगितले