प्रतिनिधी , धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपने दणदणीत मतांनी बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. 437 पैकी 434 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 4 मतं बाद झाली तर 332 मतं अमरीश पटेल यांनी मिळवत मोठा विजय मिळवला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली. विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता हि निवडणूक तुल्यबळ ठरली असती, मात्र महाविकास आघाडीने भाजपसमोर सपशल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले. आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांची तीन आकडी संख्या गाठता आली नाही, यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपाकडे वळली हे स्पष्ट होते.
या धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणुकी निकालांमुळे भाजपचा प्रभाव या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाढेल असे चित्र आता निर्माण झाले आहे, अमरीश पटेल यांचा दबदबा भाजपात वाढेल आणि महाविकास आघाडीत एकसंघता नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ते निवडणूक एकत्र लढतील याबाबत शंका वेक्त करण्यात येत आहे.
