प्रतिनिधी , MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
