जनतेज न्युज

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या गेट समोर अन्नत्याग आंदोलन.

प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदच्या गेट समोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन असंच चालू राहणार असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
शाखा अभियंता ए. एस काटकर यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, तसेच तुर्काबाद खराडी येथील १४ व्या वित्त आयोगातून झालेल्या ड्रेनेज लाईन कामाची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी, यासह नंद्राबाद कदीम शहापूर येथील ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावे आणि मौजे सिंगी येथील चौकशीसाठी अभिलेख न सादर करणारे ग्रामसेवक एस एस पवार आणि शाखा अभियंता एस. एन. पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच राहणार असल्याच आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.