प्रतिनिधी : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलना केले. धुळे शहर व जिल्हयातही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काळ्या फिती लावुन कामकाज केले. आणि उद्या एकदिवसीय लाक्षणिक संपाचा पवित्र राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे सचिव एस.यु.तायडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संघटनेने प्रामुख्याने वर्ग ४ ची पदे निरसित करु नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास त्वरित शासनसेवेत समाविष्ट करावे, अश्या अनेक मग्ण्यांकरिता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्या एकदिवसीय काम बंद करण्याचा इशारा राज्य सरकार ला दिला आहे.
