आई, वडील, भावाने केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, जखमी तरुणी रुग्णालयात
प्रतिनिधी , वसईत : अ /क .. वसईत ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 18 वर्षीय तरुणीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरूणीच्याच आई वडील व भावाने वसईतील सुरुच्या बागेतील झुडपामध्ये ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही तरुणी गळा आवळताना बेशुद्ध झाल्याने तिचा जीव बचावला आहे. स्थानिकांना हा प्रकार पाहिल्यावर पोलिसांना बोलावून जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले. तरुणीच्या जबानी वरून वसई पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
