प्रतिनिधी , जालना- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी दिपक सुभाष जाधव यांनी आपल्या अवघ्या दोन एकर शेती मध्ये वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पारंपारिक पिकांची लागवड सोडून त्यांनी फुलशेती करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच त्यांना हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिपक जाधव यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे . नोकरीच्या शोधातून नैराश्य आल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगीतले. शिक्षित तरुणांनी शेतीकडे वळले पाहीजे असे दिपक जाधव यांच मत आहे.
